शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका महिलेला किरकोळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अनिता श्रीमंत भंडारे व श्रीमंत नामदेव भंडारे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील मंगल शिंदे व अनिता शिंदे यांचा त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करण्यावरून किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर मंगल यांनी अनिताला शिवीगाळ करण्याबाबत विचारपूस केली असता अनिता व तिचा पती श्रीमंत या दोघांनी अनिताला काठीने मारहाण केली.
दरम्यान शेजारील महिलांनी त्यांची भांडणे सोडवली असून याबाबत मंगल बाळू शिंदे (वय ३३) रा. नरेश्वर रोड वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अनिता श्रीमंत भंडारे व श्रीमंत नामदेव भंडारे दोघे रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहे.
0 Comments