त्यानुसार पती सुबोध जैन (वय 42) आणि सासरा ताराचंद जैन (वय 77, रा. सुस, ता. मुळशी. मूळ रा. मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सण 2011 ते 27 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सुस आणि मध्य प्रदेश येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लग्न झाल्यापासून त्या काही कमवत नाहीत, तसेच माहेरहून काहीही घेऊन आल्या नाहीत, अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना शिवीगाळ केली. पती सुबोध याने फिर्यादीला मारहाण केली. फिर्यादी पासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात दाखल केले.
सुबोध हा दुसऱ्या मुलीला घेऊन राहत असल्याबाबत फिर्यादीने जाब विचारला असता त्यांना धक्काबुक्की करून मारहाण करत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments