सोलापूर : भांडण झाल्यानंतर माहेरी गेलेल्या पत्नीकडे जावून तिच्याकडूनच पैसे घेवून दारू पित मेव्हण्यावरच चाकूने नाकावर, गळ्यावर वार केल्याची घटना मोहोळ (जि. सोलापूर) येथे घडली आहे.
याबाबत रेवणसिध्द होनमाने ( वय २६, रा. मोहोळ ) यांनी तक्रार दिल्याने नितीन सोनटक्के ( वय ३०, रा. माेहोळ) याच्यावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन सोनटक्के याचे चार ते पाच दिवसापूर्वी पत्नीबरोबर वाद झाला होता. वादामुळे पत्नी माहेरी मुलांना घेवून राहण्यास आली होती. यानंतर गुरूवारी सायंकाळी नितीन हा पत्नी राहत असलेल्या मेव्हण्याच्या घरी जावून तेथे जेवण्यासाठी म्हणून पत्नीकडून तीनशे रूपये घेतले.
त्या पैशाने दारू घेवून जवळच असलेल्या कोकणे वस्तीकडे जाणार्या मोकळया रस्त्यावरच दारू पिली. यानंतर थोडया वेळाने माझ्या बायकोस नांदायला का पाठवत नाही म्हणून त्यााच्याजवळ असलेल्या चाकूने मेव्हणा रेवणसिध्द याच्या गळयावर आणि नाकावर वार केले. परत मेव्हण्याच्या घरी जावून तुमच्या घरातील कोणालाही जिंवत सोडणार नसल्याची धमकी दिली, अशी तक्रार दिली आहे.
0 Comments