कोरेगाव भीमात मारहाण करत मोबाईल लांबवणारे जेरबंद

 


शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथून रात्रीच्या सुमारास रस्त्याने पायी जाणाऱ्या इसमाला शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण करत मोबाईल लांबवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून विराज बाळासाहेब आरगडे व शैलेश अनंत उदार असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कारेगाव भीमा (ता. शिरुर) येथून पिंपळे जगताप रस्त्याने राम होळंबे हे १९ मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पायी जात असताना दोघा युवकांनी दुचाकीहून येऊन राम यांना शिवीगाळ, दमदाटी करुन त्यांचा महागडा मोबाईल चोरुन नेला होता. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

सदर मोबाईल विराज अरगडे वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, योगेश हवालदार यांसह आदींनी कोरेगाव भीमा येथे सापळा लावत विराज अरगडे याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार शैलेश उदार याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

दरम्यान पोलिसांनी विराज बाळासाहेब आरगडे (वय १८) रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे व शैलेश अनंत उदार (वय २०) रा. फडतरे वस्ती कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. पूसगाव ता. अंबेजोगाई जि. बीड या दोघांना अटक करत शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.


Post a Comment

0 Comments