धक्कादायक: रंग लावण्याच्या बहाण्याने परदेशी तरूनिसोबत गैरवर्तन

 


रंगांचा सण असलेला होळी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, या काळात विनयभंगासारख्या घटना वारंवार समोर येत असतात.

अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये काही मुलांनी एका परदेशी मुलीसोबत गैरवर्तन केयंय. रंग लावण्याच्या नावाखाली तरुणांनी तिची छेड काढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण या घटनेला लैंगिक छळ म्हणत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. ही घटना दिल्लीच्या पहाडगंजमधील आहे. भारतात पहिल्यांदाच होळी खेळण्यासाठी आलेल्या जापानी मुलीचा काही टवाळखोर मुलांनी विनयभंग केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आधी पीडितेने स्वतः शेअर केला होता, पण नंतर तो काढून टाकला. यानंतर इतर अनेक अकाउंट्सनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा त्या जपानी मुलीला घट्ट पकडून तिच्या दोन्ही गालावर रंग लावताना दिसत आहे. तर बाजूला उभा असलेला दुसरा मुलगा जोरात त्या मुलीच्या डोक्यावर अंडे मारताना दिसतोय. तेवढ्यात अजून एक मुलगा येऊन मुलीला पकडतो आणि बळजबरीने तिला रंग लावतो. यावेळी ती तरुणी या सगळ्यातून सुटण्याचा खूप प्रयत्न करते, पण मुलांचा ग्रुप तिला सुटू देत नाही.

या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी एक निवेदनही जारी केले आहे. सोशल मीडियावरुन त्यांना या व्हिडिओची माहिती मिळाली असून, त्यांनी तरुणीच्या संपर्कासाठी जापानी दूतावासाशीही संपर्क साधला आहे. अद्याप याप्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.

Post a Comment

0 Comments