जगातला सगळ्यात खतरनाक पक्षी , क्षणभरात घेतो माणसाचा जीव .....

 


मुंबई : अनेक वेळा असे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामुळे आपल्याला जंगल आणि वन्यजीवांबद्दल खूप चांगली माहिती मिळते. असाच एक व्हिडिओ @WowTerrifying नावाच्या अकाउंटवरुन ट्विटरवर शेअर केला गेल आहे, जो जवळपास तीन लाख वेळा पाहिला गेला आहे.

तुम्ही अनेक सुंदर पक्षी पाहिले असतील, पण जगातील सर्वात खतरनाक पक्ष्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? इतका खतरनाक की तो तुमच्या अंगावर आला तर क्षणार्धात तुमचा जीव घेऊ शकतो. व्हिडिओ पाहून लोक विविध अंदाज बांधत आहेत. चला तर जाणून घेऊया त्याचं नाव काय आणि तो कुठे आढळतो?

त्याचं नाव कॅसोवेरी आहे. ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये आढळणारा हा पक्षी शहामृगासारखा दिसत असला तरी वजनाने तो खूपच जड आहे. मादी कॅसोवेरीचं सरासरी वजन 59 किलो असतं आणि नर कॅसोवेरीचं वजन 34 किलोपर्यंत असू शकतं. सर्वच पक्षी डायनासोरचे वंशज मानले जात असले तरी, रहस्यमय कॅसोवेरी इतर पक्ष्यांपेक्षा प्राचीन डायनासोरच्या जास्त जवळचे मानले जातात.

त्यांच्या डोक्याच्या वर हेल्मेटसारखी रचना असते, अशी रचना अनेक डायनासोरकडेही होती, असं मानलं जातं. म्हणूनच याला मिनी डायनासोर असंही म्हणतात.

अनेकदा या पक्षाला आपल्या कुटुंबासोबत राहायला आवडतं आणि तो कोणावरही हल्ला करत नाही. पण एकदा चवताळल्यास तो क्षणात जीवही घेऊ शकतो.

त्यांच्या पायाच्या बोटांच्या आतील बाजूस चाकूसारखं धारदार नख असतं, ज्याने तो एखाद्या व्यक्तीचं पोटही फाडू शकतो. आक्रमक असताना ते थेट शत्रूवर आपल्या पंज्याने हल्ला करतात. त्यामुळेच सर्वात धोकादायक पक्षी म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याचं नाव नोंदवलं गेलं आहे. कॅसोवेरी पक्षी चांगल्या प्रकारे पाण्यात पोहतो आणि ते मासे खातात.

त्यांना मुख्यतः पाण्याभोवती राहायला आवडतं. 
या पक्षाचे डोळे दिसायला अतिशय भयानक असतात. त्यांना पाहून असं वाटतं, की तो कधीही हल्ला करू शकतो. हे पक्षी खूप हिंसक आहेत, तरीही जुन्या काळात लोक त्यांना मांस आणि पंखांसाठी पाळत असत.

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की मानवाने 18,000 वर्षांपूर्वी कॅसोवेरी पाळण्यास सुरुवात केली. नर घरट्यावर लक्ष देतात आणि तिथेच बसून असतात, म्हणून ते अंड्यांचं रक्षण करताना फारसं खात नाहीत. त्यामुळे शिकारींना त्यांची शिकार करणं सोपं जातं. पपाया न्यूगिनीमध्ये हे पक्षी अजूनही त्यांच्या पिसांसाठी पाळले जातात. त्यांच्या अंड्याला राष्ट्रीय अन्नाचा दर्जा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments