पिंपरी: मुलीला मारहाण करण पडलं आईला महागात , गुन्हा दाखल

 


पिंपरी;  मुलीला लाटण्याने मारहाण करून गंभीवर दुखापत करणार्‍या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 मार्च रोजी पारखेवस्ती, वाकड येथे घडला.

याप्रकरणी उपनिरीक्षक महेंद्र बाळासाहेब गाढवे (वय 35) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जखमी मुलीच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला दोन मुली आहेत. दरम्यान, बहिणींमध्ये भांडण सुरू असल्याने आरोपी महिलेने चिडून जाऊन एका मुलीला लाटण्याने बेदम मारहाण केली. यामध्ये मुलीचे दोन्ही हात, पाय, गुडघा, छाती, बरगडी आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीनंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या कृत्यामुळे मुलीचा जीव जाऊ शकतो, हे माहीत असतानादेखील मारहाण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी स्वतः
फिर्याद देऊन आईवर गुन्हा दाखल केला आहे. तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments