अतीतापामुळे 12 वीच्या विद्यार्थिनीला गमवावा लागला जीव

 


कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी अहमदनगर या ठिकाणी अन्नातून विषबाधा झाल्याने बारावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कोल्हापुरातमध्ये देखील अशीच घटना घडली आहे.

कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणीचा अतितापामुळे मृत्यू झाला आहे. श्रावणी अरुण पाटील (वय 18 वर्ष, राहणार-फुलेवाडी, दुसरा स्टॉप) असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. 

श्रावणी बारावी इयत्तेत शिक्षण घेत होती. सध्या बारावीची परीक्षा सुरू असून उर्वरित विषयांच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना श्रावणीला अचानक ताप आला आणि बघता-बघता तिने आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर आपले प्राण सोडले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रावणी पाटील ही शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती. 

मागच्या तीन-चार दिवसांपासून तिला अचानक ताप, सर्दी आणि खोकला आला. त्यामुळे आई-वडिलांनी तिला तत्काळ फुलेवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर तिच्यावर उपचार करून तिला घरी सोडण्यात आले. मात्र यानंतर सोमवारी रात्री पुन्हा तिला ताप आला. त्यामुळे रात्री तिला उशिरा सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी ती बेशुद्ध झाली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे श्रावणीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे फुलेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.


Post a Comment

0 Comments