अकोला : नेहरू पार्क चौकातून गाेरक्षण राेडवरील घराकडे दुचाकीने जाणाऱ्या आई व मुलीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने बारा वर्षीय मुलीचा बुधवारी रात्री जागीच मृत्यू झाला. आई गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले हाेते उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी जखमी आईचाही मृत्यू झाला आहे.
गोरक्षण रोड भागात राहणाऱ्या किरण तुपवणे या आपली मुलगी स्पंदना हिच्यासाेबत बुधवारी रात्री दुचाकीने घरी परतत असताना नेहरू पार्क चौकात पुलावरून उतरून येणाऱ्या एन एल ०१ - ए एफ ९१५२ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघी मायलेकी दूरवर फेकल्या गेल्या. मुलगी स्पंदनाचा जागीच मृत्यू झाला असून आई किरण तुपवणे गंभीर जखमी झाली.
अपघात घडल्यानंतर नागरिकांनी तत्काळ जखमी किरण तुपवणे यांना सर्वाेपचार रूग्णालयात दाखल केले हाेते मात्र उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी त्यांच्या मृत्यू झाला. नेहरू पार्क चाैकात उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक भरधाव असते तर सिव्हील लाईन्स, गाेरक्षण राेड व अशाेक वाटीका या मार्गावरून येतांना काेणतेही गतिराेधक, सिग्नल यंत्रणा नाही त्यामुळे येथे वाहतूकीची काेंडी हाेण्यापासून लहान माेठे अपघात नेहमीच घडतात.
0 Comments