आकाश गणेश वाकडे (वय 24, रा. कुरुळी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 17 वर्षीय मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भाड्याच्या खोल्यांमध्ये आकाश याचा मित्र भाडेकरू म्हणून राहतो. आकाश याचे त्याच्या मित्राकडे येणे होत असल्याने त्यातून आकाश आणि फिर्यादी यांची ओळख झाली. त्यातून त्याने ओळख वाढवून फिर्यादीच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केले. यात फिर्यादी तीन महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments