औषधी वाहतुकीच्या नावाखाली अवैध विदेशी मद्य वाहतून, ८६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 



मावळ : औषध वाहतुकीच्या नावाखाली अवैद्यरित्या होणाऱ्या गोवा राज्य निर्मित विदेशी दारूच्या  तस्करीवर राज्य उत्पादन शुल्कच्या तळेगाव दाभाडे विभागाने धडक कारवाई केली आहे.

सोमाटणे टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आलेली आहे.

विदेशी मद्याची अवैधरित्या तस्करी करून वाहतूक करणारा भारत बेंच कंपनीचा दहा चाकी कंटेनर ट्रक जप्त करून ही कारवाई करण्यात आली. विविध ब्रँडचे विदेशी मध्याचे व बियरचे मिळून एकूण ४४५ बॉक्स या कंटेनरमध्ये मिळून आले आहेत.

 हा मुद्देमाल फक्त गोवा राज्यात निर्मिती व विक्री करता येत असतो. परंतु, त्‍याची अवैधरित्‍या महाराष्‍ट्रात वाहतूक सुरू असल्‍याची माहिती राज्‍य उत्‍पादनक शुल्‍क विभागास मिळाली होती.

विविध प्रकारचे विदेशी मद्य व बियर असा एकूण ६५ लाख ९० हजार १६० रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि एक कंटेनर असा एकूण ८६ लाख १६० रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाकडून जप्त करण्यात आला आहे.

 तसेच शंकरलाल नारायण जोशी याला याप्रकरणी अटक करण्यात आलेले आहे. तर ओम पुरी नावाचा इसम हा अद्यापही फरार आहे. अटक आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments