बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारावीची परीक्षा झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या मुलीने घरातील पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
ही दुर्देवी घटना जिल्ह्यातील कारी गावात घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे
वैष्णवी बापुराव फरताडे (वय १७ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. नुकतीच वैष्णवीची बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. परीक्षेनंतर वैष्णवी नैराश्यात होती. कुटुंबीयांनी तिचे समुपदेशन केले. मात्र, तरीही ती नैराश्यात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान, आई-वडील आणि भाऊ शेतात कामासाठी गेले असताना घरात एकटी असलेल्या वैष्णवीने घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवले. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments