कोणताही सण, उत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो, घरातील भांडण असो की राजकीय मोर्चा पोलीस हे नेहमीच आपल्या कर्तव्यासाठी तत्पर असतात. घर-दार विसरुन कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या पोलिसांचे अनेक किस्से आपण एकत असतो.
रखरखत्या उन्हात माणुसकीचं दर्शन
हैदराबादमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्याला माहिती आहे, एप्रिलमध्येच उन्हाळा इतका वाढलाय की घराच्या बाहेर पडायला नको वाटत. त्यात आपले ट्राफिक पोलीस दिवसभर रस्त्यावर रखरखत्या ऊन्हात कर्तव्य पार पाडत असतात. उन्हाळ्यात वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना उष्माघात किंवा वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. अशातच एका मुलानं ट्राफिक पोलिसांना भर ऊन्हात उभं असताना पाण्याच्या बॉटल्स दिल्या. आपल्यासाठी भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना हे काम केलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पोलिसांच्या चेहऱ्यावरील समाधान आनंद पाहू शकता.
व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असून हजारो व्ह्यूज या व्हिडीओला मिळत आहेत.
0 Comments