चिकन रस्सा जीवावर बेतला , माथेफिरू बापाने केली मुलाची हत्या

 


चिकनचा रस्सा खायला न मिळाल्याने एका माथेफिरू बापाने आपल्या 32 वर्षीय मुलाची हत्या केली आहे. याप्रकरणी त्या माथेफिरू बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया तालुक्यातील गुट्टीगर येथील ही घटना आहे.

शीना असे त्या माथेफिरू बापाचे नाव आहे. शीना मंगळवारी घरी आला तोपर्यंत त्याचा मुलगा शिवरामने चिकनचा रस्सा संपवला होता आणि शिनासाठी चिकनचा रस्सा शिल्लक राहिला नव्हता. यामुळे शीना प्रचंड संतापला आणि भांडण करू लागला. यावरून मुलगा शिवराम आणि शिनामध्ये वाद झाला. बघता बघता त्यांचा वाद मारामारीवर पोहोचला आणि संतापलेल्या शीनाने शिवरामच्या डोक्यावर जोरात दांड्याने मारले आणि त्यात तो जबरदस्त जखमी झाला. डोक्यावर जबरदस्त मार लागल्याने शिवरामचा जागीच मृत्यू झाला. शिवरामच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत.

घटनेची माहिती मिळताच सिब्रम्हण्य पोलिसांनी आरोपी बापाला अटक केले आहे. तर याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत 

Post a Comment

0 Comments