यश नागेश मळगे (वय 30, रा. कोथरूड, पुणे) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश हे शनिवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास बावधन येथे चांदणी चौकाजवळ फोनवर बोलत थांबले होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्ती तिथे आले. त्यांनी यश यांच्या खिशातून पैशाचे पाकीट आणि मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.
यश यांनी आरोपींना प्रतिकार केला असता आरोपींनी यश यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर यश यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments