अरुण नारायण पवार (वय 49, रा. रासेफाटा, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांच्या पत्नी आणि मुले शनिवारी रात्री घराच्या टेरेसवर झोपले होते. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी गेटचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले.
कपाटातून 50 हजारांचे मिनीगंठण, अंगठी, डोरले, जिरा मणी, 10 हजार रोख रक्कम, 5 हजारांचा एक मोबाईल फोन असा एकूण 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments