अहमदनगर : कोपरगावात दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा !

 



कोपरगाव (जि.अहमदनगर) : शहरातील किशोर वाईन्स येथून देशी- विदेशी दारूचे बॉक्स घेऊन शिर्डी येथील हॉटेल शीतलमध्ये विक्रीसाठी चारचाकी वाहनातून विनापरवाना चोरून वाहतूक करणाऱ्यावर नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने शनिवारी (दि.१) रात्री १२.३० च्यासुमारास धाड टाकत कोपरगाव ते शिर्डी तिनचारी हनुमान मंदिराजवळ करवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी १ लाख ८६ हजार ९६० किमतीच्या देशी विदेशी कंपनीच्या दारुच्या बाटल्या व ३ लाख रुपये किमतीचे महेंद्रा इम्पेरीओ कंपनीचे चारचाकी वाहन(क्र. एम. एच. १७ बी.डी. ८१४१ ) असा एकूण ४ लाख ८६ हजार ९६० रुपये किमतीच्या मुदेमालासह एकास अटक केली आहे.

या प्रकरणी नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक पथकातील पोलीस हवालदार शकील अहमद शेख यांनी सौरभ दगु राऊत, पंकज दळवी, किशोर वाईन्सचे मालक, वाहन मालक माला धोंगडी, शिर्डी येथील शितल हॉटेलचे मालक स्वप्नील पारडी व भावड्या जगताप अशा सहा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सौरभ राऊत यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments