याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार दिवसे, गणेश गुऱ्हाळे, सुनील यादव, बबन कुऱ्हाडे, विशाल वाघमारे, भाऊसाहेब दावणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदवडी गावात मटका जुगार सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत चिठ्ठ्या, कार्बन पेपर, पेन, बुक, रोख रक्कम असा एकूण 14 हजार 50 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी ओपन टाईम बाजार नावाचा मटका खेळत असल्याचे समोर आले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments