पुणे : तोंड ओळखीच्या तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग करत तिचा विनयभंग केला. तसेच, तिला भररस्त्यात शिवीगाळ देखील केली. वारजेतील रामनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात २० वर्षीय पिडीत तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे.
तक्रारदार तरुणी व आरोपी एकमेकांना ओळखतात. तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात होती. ती पायी जात असताना संशयित आरोपीने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. तिला थांबण्यास सांगितले. पण, तरुणी न थांबल्याने त्याने शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद केला असून, पसार झालेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments