पुणे पोलीस मित्र संघटने तर्फे २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण


Pune : पुणे येथे पोलीस मित्र संघटनेतर्फे  २६ / ११ मुंबई दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी, व निरपराध नागरिक व सीमेवरील शाहिद जवानांना  बालगंधर्व चौक,  झाशीची राणी पुतळा येथे  भावपूर्ण  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 या प्रसंगी अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सौ. गिरिषा निंबाळकर ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन ), श्री चंद्रशेखर सावंत ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर ), राजेंद्र कपोते ( अध्यक्ष, पोलीस मित्र संघटना ) यांच्या हस्ते शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी  स्थायी  समिती मा.  अध्यक्ष  बाळासाहेब बोडके, मा. नगरसेविका  नीलिमा खाडे, चेतन शिंदे, मा. पी. एम. टी. अध्यक्ष चंद्रशेखर कपोते,किशोर  घोळवे , चैतन्य जगताप, सचिन काळे, मनीष  सोनिग्रा, सुमित दरंदळे ,प्रीती भट्टी, गौरी  गद्रे ,सारिका मर्चन्ट, रोहिणी भोसले, विमल काळभोर  दामिनी पथक, व पोलीस मित्र संघटनांचे पधादिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी या प्रसंगी  " शहीद जवान अमर रहे " च्या घोषणा दिल्या.

Post a Comment

0 Comments